Ad will apear here
Next
‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ मराठीतही

मुंबई : शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील तान्हाजी : द अनसंग वॉरीयर हा चित्रपट आता मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात दहा जानेवारी २०२० रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 

अजय देवगण आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या हिंदी आणि मराठीतील चित्रपटाची निर्मिती अजय देवगणच्या ‘एडीएफ’ आणि भूषण कुमारच्या ‘टी-सिरीज’ने केली आहे. दिग्दर्शनाची धुरा ओम राऊत याने  सांभाळली आहे.  

मराठी आवृत्तीविषयी बोलताना काजोल म्हणाली, ‘मला ही महाराष्ट्रीय व्यक्तिरेखा निभावणे प्रचंड भावले. मी आजीच्या, पणजीच्या मायेखाली लहानाची मोठी झाले. मी त्यांना पाहायचे. मी माझा स्वत:चा भूतकाळ जगले, असे वाटते. मी माझ्या आईच्या साड्या नेसून बालपणीचा खेळ खेळतेय असेच वाटले. मी प्रचंड प्रेमात पडले. मला संधी मिळाली, तर मी रेड कार्पेटवरदेखील नऊवारी साडी नेसून जाईन! सावित्री ही व्यक्तिरेखा कणखर आणि अफलातून आहे. माझ्यात तिच्यातले करारीपण चपखल उतरले. मी तिच्या रुबाबाच्या प्रेमात आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZTRCH
Similar Posts
सोनी मराठीवर साजरा होणार उत्सव लोककलांचा मुंबई : सोनी मराठी वाहिनीवर दोन डिसेंबरपासून लोककलांवर आधारित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा कार्यक्रम सुरू होत आहे. दोन डिसेंबरपासून सोमवार आणि मंगळवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे.
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
पुणेकरांनी अनुभवली मांगल्याची ‘स्वर-प्रभात’ पुणे : नुकतीच सुरू झालेली थंडी... सभोवताली पसरलेली धुक्याची शाल... अन मंत्रमुग्ध करणारे सनईचे सूर...अशी मंगलमय सकाळ पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते पहाटेच्या रागांवर आधारित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language